spot_img
spot_img

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी सकल हिंदू समाज मैदानात! चिंचोली काळदात येथे रस्ता रोको; निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी

राशीन (जनता आवाज वृत्तसेवा):-  अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याची घटना समोर आल्यानंतर संतप्त पडसाद उमटले. घटनेचा तीव्र निषेध नोंदवत सकल हिंदू समाजाच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी नागरिक, शिवभक्त आणि हिंदू समाज मोठ्या संख्येने एकत्र आला.

आंदोलनाला अहिल्यानगर शहराचे आमदार हिंदू रक्षक संग्राम भैय्या जगताप, अकलूजचे हिंदू रक्षक डॉ. धवलसिंह दादा मोहिते पाटील, शिवसेना तालुका प्रमुख डॉ. नितीन तोरडमल, शिवसेना कामगार जिल्हा उपप्रमुख चंदनसिंग परदेशी, प्रसाद कानगुडे, ऋषिकेश धांडे, पंडाराजे बोरुडे, सुनील काका यादव, रघु आबा काळदाते, दीपक गांगर्डे, दीपक मांडगे, उदयसिंग राजपूत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व सकल हिंदू समाजातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही. घटनेची सत्यता समोर आणून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी केली.

“एक पीडित बंधू, साथीला लाखो हिंदू!”

रस्ता रोको आंदोलनादरम्यान शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला. आंदोलन शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गाने करण्यात आले असून, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

ही केवळ गर्दी नव्हती; तर शिवरायांच्या सन्मानासाठी एकवटलेली जनशक्ती होती!

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!