लोणी दि.२( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लोणीत ‘ आजी आजोबा दिन’, मातृ पितृ दिन आणि हिंदी दिनाचे औचित्य साधून शाळेत आजी आजोबा दिन व मातृ-पितृ पूजन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळ प्रमुख अतिथी म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी संचालक श्री बन्सी तांबे पाटील, कला वाणिज्य महाविद्यालय कोल्हार चे हिंदी प्राध्यापक श्री उत्तम येवले , ह.भ. प. राहुल महाराज पोकळे, सरपंच लोहारे, पालक प्रतिनिधी राहुल बेंद्रे , लोकल कमिटी सदस्या सौ ललिता ताई आहेर, लोणी बुद्रुक सरपंच कल्पनाताई मैड, आजी आजोबा प्रतिनिधी ज्ञानदेव बेंद्रे व सौ उषाताई बेंद्रे यांच्या समवेत ४३० आजी आजोबा पालकांची उपस्थिती होती.
याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थिनींनी आजी-आजोबा व माता-पित्यांकडून मिळणारे संस्कार व त्यातून फुलणारे त्यांचे जीवन याबाबत कृतज्ञता व्यक्त करत मनोगते व्यक्त केली. बन्सी पाटील तांबे यांनी एकत्र कुटुंबातून मुलांवर होणारे संस्कार व आजच्या काळाची एकत्र कुटुंब पद्धतीची गरज या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच हिंदी विभागाचे प्रा उत्तम येवले यांनी हिंदी भाषेचे महत्व अत्यंत प्रभावी शैलीत सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सौ बेबीताई विखे यांनी हिंदी कवितेतून आपले मनोगत व्यक्त केले. कु. शिवतेज राहुल पोकळे या के.जी.च्या विद्यार्थ्याने हनुमान चालीसा सादर केली . पाडुरंग शेवते रिटायर्ड आर्मी ऑफिसर लोणी यांनी मनोरंजक गोष्टीतूनआपले मनोगत व्यक्त केले.
सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मातृ -पितृचे औक्षण करून त्यांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त केला. सर्व पालक व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले होते. विद्यालयाच्या प्राचार्या श्र भारती देशमुख , उपप्राचार्य रेखा रत्नपारखी रेखा,सौ. घोगरे , शिक्षिका सौ.एस.आर.शेख एस. आर. उपस्थित होत्या.
.



