spot_img
spot_img

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

नगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासमवेत बाजीराव गवारे, काशिनाथ लवांडे, सुभाष पाटील, बाळकृष्ण बानकर, धनराज गाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राहुरी मतदारसंघातून कर्डिले चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. भाजपची उमेदवारी त्यांनाच पुन्हा मिळाली असून कर्डिले समर्थकांचा उत्साह यंदा शिगेला पोहचल्याचे पहायला मिळत आहे. २०१९  च्या निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठील कर्डिले समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडत अनेक दिग्गजांनी भाजपत प्रवेश केला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!