संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा): –संगमनेर तालुक्यामध्ये ब्लॅकमेल करून महाविद्यालयातील तरुणीवर अत्याचार केला आणि खोटे मॅरेज सर्टिफिकेट तयार करून तिचे लग्नही मोडणाऱ्या तरुणाविरुद्ध मुलीच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकरंद नामक असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, की एक तरुणी शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. इन्स्टाग्रामवर तिची तरुणाशी ओळख झाली. त्याचा गैरफायदा घेत त्याने तरुणीसोबत फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला.
दरम्यान, सदर मुलगी सुटत गावी गेली असता तेथेही त्याने त्रास दिला. सुटी संपल्यानंतर तरुणी पुन्हा शहरात आली. यावेळी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीच्या मामालाही त्याने दमबाजी केली.
पीडितेच्या नातेवाइकांनी हे सर्व प्रकार शहर पोलिसांना सांगितले. त्यानंतर आरोपी याच्याविरुद्ध येथील शहर पोलिस ठाण्यात अत्याचारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, पीडित तरुणीचे लग्न जमले होते. तेव्हा आरोपीने संबंधित वराच्या नातेवाइकांना सांगितले की, हिचे आणि माझे प्रेमसंबंध आहेत. आम्ही रजिस्टर लग्न केले आहे. मित्रांना फोनवर रजिस्टर लग्न झाल्याचे बनावट कागदपत्र टाकून आरोपीने पीडित मुलीचे लग्न मोडल्याचेही पोलिसांनी सांगितले.




Total Users : 635496