मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):-भिवंडी येथील इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ९ वर पोहोचली असून घटनास्थळी अद्यापही भीतीचे सावट कायम आहे
अग्निशामक दल आणि बचाव पथकांकडून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जसजसा ढिगारा बाजूला केला जात आहे तसतसा मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली एक लहान मुलगा अडकल्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्याने बचावकार्य अधिक खबरदारीने आणि वेगाने चालवले जात आहे. या दुर्घटनेतील अडकलेल्या इतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पथके कसून प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ३ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
भिवंडी शहरातील भंडारी कम्पाउंड भागात घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेनंतर घटनास्थळी बचावकार्य अत्यंत वेगाने सुरू आहे. एनडीआरएफ आणि टीडीआरएफ च्या जवानांकडून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर चालवले जात आहे




Total Users : 599228