spot_img
spot_img

विधानसभेत मांडलेल्या मागणीला अखेर यश दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या अभिनेत्यांना FDA ची कारणे दाखवा नोटीस

मुंबई( जनता आवाज वृत्तसेवा):- इलायची, सौफ अथवा तत्सम उत्पादनांच्या नावाखाली जाहिराती करून प्रत्यक्षात फ्लेवर्ड सुपारी, तंबाखू, पान मसाला व गुटख्यासारख्या उत्पादनांच्या ब्रँडचा अप्रत्यक्ष प्रचार करणाऱ्या जाहिरातींबाबत मी ४ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत ठामपणे आवाज उठवला होता. अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या अभिनेते व सेलिब्रिटींवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी मी शासनाकडे केली होती.

या मागणीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता यश आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अशा जाहिरातींमध्ये सहभागी असलेल्या अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ही कारवाई केवळ एखाद्या जाहिरातीपुरती मर्यादित बाब नसून सार्वजनिक आरोग्य आणि विशेषतः तरुण पिढीच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.

एका बाजूला तंबाखू, गुटखा व आरोग्यास घातक उत्पादनांवर निर्बंध असताना, त्याच ब्रँडच्या नावाने इलायची, सौफ किंवा अन्य उत्पादनांची जाहिरात करून ब्रँडला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली जाते. लोकप्रिय अभिनेते आणि सेलिब्रिटींचा चेहरा वापरल्यामुळे अशा ब्रँडबाबत समाजात, विशेषतः युवकांमध्ये, आकर्षण आणि स्वीकारार्हता निर्माण होण्याचा धोका असतो.

“जाहिरात इलायचीची किंवा सौफची असली, तरी त्यामागे जर तंबाखू, पान मसाला किंवा गुटख्याच्या ब्रँडची प्रसिद्धी होत असेल, तर केवळ उत्पादनाचे नाव बदलून सामाजिक जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. मोठ्या सेलिब्रिटींच्या प्रसिद्धीचा प्रभाव लाखो तरुणांवर पडतो. त्यामुळे अशा जाहिराती स्वीकारताना त्यांचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, हीच भूमिका मी विधानसभेत मांडली होती.”

या विषयावर परिणाम दिसण्यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागला; मात्र सातत्याने केलेला पाठपुरावा अखेर फलदायी ठरला आहे.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. कारणे दाखवा नोटीस ही कारवाईची सुरुवात आहे. पुढील प्रक्रियेत कायद्याच्या तरतुदींनुसार योग्य ती ठोस कारवाई होणे आणि अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रभावी आळा बसणे आवश्यक आहे.

“विधानसभेत प्रश्न मांडणे ही केवळ सुरुवात असते. त्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून प्रत्यक्ष निर्णय आणि कारवाईपर्यंत नेणे महत्त्वाचे असते. ४ जुलै २०२५ रोजी मांडलेल्या मागणीवर आज कारवाई सुरू झाली, याचे समाधान आहे. एक वर्ष लागले, पण पाठपुराव्याला यश आले. जनहिताचा विषय असेल तर तो अंतिम परिणाम मिळेपर्यंत सोडायचा नाही, हीच माझी भूमिका आहे.”

एक वर्षाचा पाठपुरावा — आता प्रत्यक्ष कारवाई

४ जुलै २०२५ : महाराष्ट्र विधानसभेत मुद्दा उपस्थित

मागणी : अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या अभिनेते/सेलिब्रिटींची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी

सातत्यपूर्ण पाठपुरावा : शासन व संबंधित यंत्रणांकडे विषयाचा पाठपुरावा

१६ ऑगस्ट २०२६ : FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून संबंधित अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस

“उशीर झाला, पण पाठपुरावा थांबला नाही — आणि अखेर जनहिताच्या लढ्याला यश मिळाले.”

— विक्रम पाचपुते

आमदार, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!