मेष :
कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत दिवस चांगला. उत्पन्न वाढेल.
वृषभ :
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. नोकरी-व्यवसायात मेहनतीचे चांगले फळ मिळेल.
मिथुन :
तुमची बुद्धिमत्ता, संवादकौशल्य प्रभावी ठरेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी मिळेल. कुटुंबातील जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्या.
कर्क :
महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण, करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत.
सिंह :
महत्त्वाचे निर्णय घेताना घाई टाळा. कामाचा ताण वाढू शकतो. आर्थिक स्थिती ठीक राहील. मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या.
कन्या :
दिवस प्रगतीच्या दृष्टीने विशेष चांगला ठरू शकतो. खडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. आर्थिक लाभाचेही संकेत आहेत.
तूळ :
आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता. प्रवासातून लाभ मिळेल. नातेसंबंधांमध्ये गोडवा राहण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल.
वृश्चिक :
मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी आणि संयम आवश्यक. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल
धनू :
उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील. प्रवासात खर्चाचे नियोजन करा. प्रेमसंबंध, कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल जाणवतील.
मकर :
भाग्याची साथ मिळेल. करिअरमध्ये सकारात्मक बदल आणि आर्थिक लाभाची शक्यता आहे. मानसिक समाधान मिळेल.
कुंभ :
निर्णय घेताना घाई टाळा. व्यवसाय किंवा गुंतवणुकीत संधी मिळू शकतात, पण कागदपत्रांची तपासणी आवश्यक आहे.
मीन :
कामातील अडथळे कमी होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक निर्णय लाभदायी ठरेल. प्रियजनांशी संवाद होईल




Total Users : 631802