अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- औद्योगिक क्षेत्राल चालना देण्यासाठी महायुती सरकारने नगरमध्ये ६०० एकरच्या जागेसह नव्या एमआयडीसीला परवानगी दिली आहे. त्यामुळे नवे मोठमोठी औद्योगिक प्रकल्प नगरमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हा प्रकल्प नगरसाठी बुस्टर डोस ठरणार असून मोठ्या प्रमाणात लहान उद्योगांना चालना व रोजगार वाढणार आहे.
इंडस्ट्रीयल इस्टेट या औद्योगिक वसाहतीचे अनेक प्रश्न व समस्या मांडल्या गेल्या. त्यातील अनेक सोडवल्या आहेत. अंतर्गत रस्ते काँक्रीटचे झाली असल्याने येथे वर्दळ वाढणार आहे. शहराचा चहूबाजूंनी सर्वांगीण विकास होत असल्याने चांगल्या नागरी सुविधा मिळत असल्याने शहरात लोकवस्ती वाढत आहेत. या विकासाच्या चाकाची गती वाढवण्यासाठी सर्वांनी एकएक पायडल मारणे आवश्यक आहे. यासाठी या निवडणुकीत मला पुन्हा एकदा आपला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी केले.
विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी नगर विकास यात्रेत इंडस्ट्रीयल इस्टेट मधील उद्योजकांशी संवाद साधून निवडणुकीतील आपली भूमिका मांडली. यावेळी अहमदनगर इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन अरविंद गुंदेचा यांनी आ. संग्राम जगताप यांचे स्वागत करून सत्कार केला.
यावेळी व्हाईस चेअरमन निलेश मेहेर, संचालक संतोष बोथरा, मेहुल भंडारी, संतोष बोरा, नितीन पटवा, सतीश बोरा, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे व संजय चोपडा आदींसह इंडस्ट्रीयल इस्टेटमधील उद्योजक उपस्थित होते.यावेळी इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन अरविंद गुंदेचा यांनी आ. जगताप यांना तिसऱ्यांदा शहराचे आमदार करण्यासाठी इंडस्ट्रीयल इस्टेट मधील सर्व उद्योजक आपल्या परिवार व कर्मचाऱ्यांसह त्यांच्या मागे उभे असल्याची ग्वाही दिली.
प्रास्ताविकात संतोष बोरा यांनी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आ. जगताप यांनी केलेल्या कामांची माहिती दिली. नितीन पटवा यांनी आभार मानले.




Total Users : 611233