पाथर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ): — जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव येथे सर्व्हीस सेंटर चालवणारे कल्याण देविदास मरकड वय 32 हे दिपावलीच्या दिवशी शुक्रवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ नऊच्या सुमारास लक्ष्मीपूजन केलं परंतु जेवण करण्याअगोदर मित्रांना भेटून येतो म्हणून घराच्या बाहेर पडले.
त्यानंतर ते पुन्हा घरी परतलेच नाहीत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मित्र परिवाराकडे चौकशी केली परंतु काहीच माहिती मिळत नसल्याने संपूर्ण मरकड कुटुंब गडबडून गेले. दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी मरकड कुटुंबाने पाथर्डी पोलिसांकडे कल्याण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. नातेवाईक मित्र परिवाराकडे विचारपुस सुरू असतानाच प्रवरा नदी पात्रामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आसल्याची माहिती नेवासा पोलीस स्टेशन कडून पाथर्डी पोलीस स्टेशनला समजली त्यानंतर मरकड कुटुंबाने तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली.
त्यानंतर नेवासा पोलीस स्टेशनकडून मृतदेह ताब्यात घेण्यात आला व अहमदनगर येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये मृतदेह दाखल करण्यात आला मात्र कुटुंबाने घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केल्याने कल्याण मरकड यांचा मृतदेह छत्रपती संभाजी नगर येथील सरकारी हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आला. तिथे मृतदेहाचे बुधवारी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठ्या दुःखद अंतकरणाने तिसगाव या ठिकाणी कल्याण मरकड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कल्याण मरकड यांच्या शरीरावरील जखमा कुटुंबियांनी पाहिल्यानंतर हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला.
त्यानंतर नेवासा पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अहमदनगर यांनी या घटनेचा पुढील तपास करण्याच्या दृष्टीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या घातपाताच्या संशयावरून तिसगाव मधील काही संशयीतांना ताब्यात घेतल्याची माहिती समजली आहे. नेवासा पोलीस स्टेशनला कल्याण मरकड यांच्या खुनाचा गुन्हा त्यांच्या नातेवाईकाकडून दाखल करण्यात आला असल्याची माहिती समजली असून या प्रकरणासंदर्भात पाथर्डी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची देखील यामध्ये मदत घेतली जात आहे.मयत कल्याण मरकड यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षाची मुलगी, सात वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. एका कष्टाळू होतकरू तरुण व्यवसायिकाचा खून झाल्याची घटना घडल्याने तिसगावसह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



