शेवगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात नेवासा रोडवरील राठी हॉस्पिटलच्या पाठीमागील भागात मोठ्या प्रमाणात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पत्र्याच्या शेड किंवा गोदामाला ही आग लागली असून आगीने काही वेळातच मोठे रूप धारण केले. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने, अद्याप जीवितहानीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शेवगाव नगरपरिषद कर्मचारी आग विझवण्यात प्रयत्न करीत होते मात्र आगीचे नियंत्रण फार मोठ प्रमाणात त्यामुळे शेवगाव नगरपरिषद कडे अग्निशमन गाडी नसल्यामुळे फार मोठा नुकसान झाल्याची माहिती समजत आहे.
त्यामुळे मागील अनेक वर्षापासून शेवगाव ग्रामपंचायत च्या काळातून पासून आत्ता शेवगाव नगर परिषद च्या काळात कोणते अग्निशामक गाडी,आली नाही अनेक वेळा सांगू नाही, दुर्लक्ष करत आहे,लोकप्रतिनिधी लक्ष देतील का याकडे नागरिकांचा लक्ष लागला आहे.



