spot_img
spot_img

नगर शहरात महाविकास आघाडीला धक्का ठाकरे गटाच्या महिला पधाधिकाऱ्यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश  आ. संग्राम जगताप यांची ताकद वाढली

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-  नगर शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले. आज (दि.३०) सायंकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गटातील महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला.  

पक्षांतर्गत वाद, महिला पदाधिकाऱ्यांना विचारात न घेणे आदी कारणांमुळे ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख आशाताई निंबाळकर, शहर प्रमुख अरुणा गोयल, उपशहर प्रमुख मुक्ताताई मेटे, मंगलाताई गुंदेचा, राधा सोनाग्रा, ज्योती गोयल, सुजाता कदम, श्रुती शिंदे, आशाताई शिंदे, सुषमा पडोळे, लता पठारे, संगीता ससे, प्रमिला गोयल आदींनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. पक्षांतर्गत वाद, महिला पदाधिकाऱ्यांना विचारात न घेणे त्यामुळे शिवसेनेला डच्चू देत आमदार संग्राम जगताप यांच्या विकास कामांना प्रेरित होऊन आज त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला असल्याची माहिती या महिला पदाधिकाऱ्यांनी दिली.

आ. संग्राम जगताप यांच्या विकासकामांवर समाधानी

आ. संग्राम जगताप यांनी मागील दहा वर्षात नगर शहर मतदार संघात मोठी विकासकामे केली आहेत. शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणला. रस्त्यांची दुरवस्था दूर होत आहे. शहर विकासाच्या दृष्टीने पुढे जात आहे. अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यामुळे आ. संग्राम जगताप यांच्या विकासकामांवर आम्ही समाधानी आहोत. केवळ संग्राम जगताप हेच शहराचा विकास करू शकतात अशी प्रतिक्रिया आशाताई निंबाळकर यांनी दिली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!