spot_img
spot_img

आ.संग्राम जगताप यांचे नगरकारांशी ऋणानुबंध : शीतल जगताप शहरात छोट्या बैठकांना महिलांचा प्रतिसाद

नगर( जनता आवाज वृत्तसेवा) :– महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सुविद्य पत्नी माजी नगरसेविका शीतल जगताप याही प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्या आहेत. सौ.जगताप या शहर व उपनगरमधील विविध वसाहतींमध्ये महिलांच्या गाठीभेटी घेत आहेत. आ.संग्राम जगताप यांनी केलेल्या विकासकांची सविस्तर माहिती, तसेच राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती सौ.जगताप महिलांना देत आहेत. सर्व ठकाणी त्यांच्या या छोट्या बैठकांना महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी शीतल जगताप म्हणाल्या, राज्यातील महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात महिलांना केंद्रस्थानी ठेवत भरपूर योजना सुरु केला आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सारख्या अनेक योजन या महिलांना आधार देणाऱ्या आहेत. नगरमध्ये आ.संग्राम जगताप यांच्या माध्यामतून या सर्व योजनांचा लाभ शहरातील महिलांना मिळत आहे. नगर शहराच्या सर्वांगीण विकासाठी आ.संग्राम जगताप हे कायम प्रयत्नशील असल्याने त्यांना मोठे यश आले आहे. आज नगर शहरातील सर्वच भागांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विकास कामे झाली आहेत. या माध्यमातून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न व समस्याही सुटल्याने आ.संग्राम जगताप यांचे शहरातील नागरिकांशी ऋणानुबंध जुळत अतुट नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांना या विधानसभा निवडणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!