नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा ):- प्रभाकर शिंदे यांना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी मिळेल, अशी सर्वांना आशा होती. मात्र या आशेची निराशा झालेली आहे. जिल्ह्यातील भाजपच्या एका नेत्या प्रतिष्ठापणाला लावत नेवाशातील उमेदवारी बदलेली आहे. शिंदेंचा शिंदे गटात घात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यामुळे झालेला आहे. त्यामुळे शिंदेंनी आता अपक्ष निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांमधून होत आहे.
विधानसभा निवडणुकीत नेवशाची जागा नेमकी कोणत्या गटाला मिळणार याविषय़ी सर्वांमध्ये उत्सुकता होती. ही जागा शिंदे गटाला मिळावी, यासाठी शिंदे गट आक्रमक होता. तसेच ही जागा भाजपला मिळावी, यासाठी भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले. नेवाशातील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, सचिन देसर्डा इच्छुक होते.
परंतु ही जागा शिंदे गटाला गेल्याने सगळ्यांच्याच अडचणी वाढल्या. परंतु ही जागा भाजपला मिळावी, यासाठी जिल्ह्यातील भाजपच्या एका नेत्याने आपली प्रतिष्ठापणाला लावली. वर्षा बंगल्यावर दोन ते तीन दिवस मुक्काम ठोकला. परंतु शिंदे गट जागा आपल्याच गटाला हवी या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे पेच वाढत गेला. उमेदवारी भरण्याच्या पूर्वसंध्येला जागेचा पेच सुटला.
वर्षा बंगल्यावर मॅरेथाॅन बैठक झाली. या बैठकीला नेवाशातील भाजप व शिंदे गटातील नेते मंडळी व भाजपचे ते नेतेही उपस्थित होते. यामध्ये ही जागा शिंदे गटाला राहून देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला. मात्र या जागेवर भाजपमधून शिंदे गटात विठ्ठल लंघे यांनी घेऊन उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. ऐनवेळी उमेदवार बदल्याने शिंदे गटातील समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
पक्षाने शिंदे यांना निवडणुकीची तयारी करण्यास सांगून एक प्रकारे त्यांचा घात केलेला आहे. हा घात होण्यास जिल्ह्यातील भाजपचा तो उमेदवार कारणीभूत आहे. त्यामुळे आता ऐनवेळी त्यांच्या सांगण्यावर जर उमेदवारी बदलण्यात आलेली आहे. तर आता लंघे यांच्या प्रचाराची जबाबदारी भाजपच्या त्याच नेत्यावर सोपवावी, अशी अपेक्षा शिंदे गटातील नाराज कार्यकर्ते करू लागलेले आहेत. लंघे यांच्या प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय शिंदे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता लंघे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.प्रभाकर शिंदे यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाले. आता माघार घेण्याऐवजी त्यांनी अपक्ष उमेदवारी करावी, अशी अपेक्षा शिंदे समर्थकांमधून होत आहे. शिंदे यांच्या सारखा सक्षम नेता तालुक्याला लाभणार आहे. त्यामुळे त्यांनी आता निवडणूक अपक्ष लढविण्याचा निर्धार करून रणांगणात उतरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




Total Users : 611417