spot_img
spot_img

अखेर गोकुळ दौंड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाच ! गोकुळ दौंड यांच्या बंडखोरीमुळे आ. मोनिका राजळे यांच्या अडचणीत भर

शेवगाव( जनता आवाज वृत्तसेवा):-भाजपाच्या ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आज (सोमवार) दुपारी दोनच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल केला. यापुर्वीच भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावला आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळ दौंड यांच्या बंडखोरीमुळे आमदार मोनिका राजळे यांच्या अडचणीत अजून भर पडली आहे.

यापूर्वी मेळाव्याचे आयोजन करुन दौंड व मुंडे या जोडगोळीने बंडखोरीचा इशारा दिला होता. परंतु, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या या इशाऱ्याला गांभिर्याने न घेतल्याने अखेर त्याचे पर्यवसान दौंड यांच्या उमेदवारी अर्जात झाले. अरुण मुंडे यांनी मात्र बंडाचा इशारा देऊनही अद्याप त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. यावर पत्रकारांनी दौंड यांना विचारले असता ते म्हणाले, कुणी काय करायचं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. या मतदारसंघाचा विकास करणं हे माझं कर्तव्य आहे. पक्षश्रेष्ठी अजूनही माझ्या संपर्कात आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी दौंड यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन घेतलेल्या भेटीबद्दल विचारले असता ते म्हणाले, की खासदार साहेबांची आणि माझी मैत्री राजकारणाच्या पलिकडची आहे. राजकारण आणि वैयक्तिक संबंधात फरक असतो. राजकारण हे होतंच असलं तरी मित्रसंबंधही जपावेच लागतात.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!