अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- आ. संग्राम जगताप पहिल्या वेळेस आमदार झाले तेव्हा विरोधी बाकावर बसले. मात्र दुसऱ्या वेळेस निवडून आल्यानंतर सत्ताधारी पक्षात होते मात्र मोठा काळ करोना संकट काळात गेला. राज्यात झालेल्या उलथापालथीनंतर अत्यंत कमी कालावधी आ.जगताप यांनी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करत हजारो कोटींचा निधी त्यांनी शहराच्या विकासासाठी आणला. त्यामुळे आज आपले नगर शहर विकासाच्या दिशेने जात आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र खो-खो संघटनेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ करसल्लागार अशोक पितळे यांनी करून कोरोना सारख्या महामारीतही आ.संग्राम जगताप यांनी शहरातील नागरिकांना मोठा आधार दिला.
शहराचे विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना अहिल्यानगर सीए शाखेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. याप्रसंगी अशोक पितळे बोलत होते. याप्रसंगी सिए शाखेचे अध्यक्ष सीए सानित मुथा, सचिव अभय कटारिया, खजिनदार महेश तिवारी, माजी अध्यक्ष सीए मोहम बरमेचा, मिलिंद जांगडा, पवन दरक,5 सुशील जैन, किरण भंडारी, आदींस शाखेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
पुढे बोलताना पितळे म्हणाले की गेल्या 12 ते 13 महिन्यात अनेक प्रकल्प पूर्णत्वास आमदार जगताप यांनी नेले. शहराचे वैभव असलेले क्रीडा संकुलांसाठी 15 ते 20 कोटी रुपयांचा निधी त्यांनी दिला. बुरुडगाव येथे अद्यावत हॉस्पिटलची निर्मिती त्यांनी केली .विळद घाट येते अद्यावत अशा एमआयडीसीसाठी सहाशे एकर जागेची उभारणी . त्या माध्यमातून मोठी उद्योग नगरी शहरांमध्ये उभी राहणार आहे . शहराच्या विकासाला गती मिळणार आहे .अजून विकासाला हातभार लावण्यासाठी त्यांची हॅट्रिक आपल्या सर्वांना पहायची आहे .त्यासाठी त्यांना सर्वांनी भरघोस मताधिक्याने विधानसभेवर तिसऱ्यांदा पाठवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, ही निवडणूक केलेल्या विकास कामावर लढवत आहे. शहराला कोण पुढे नेणार हे महत्त्वाचे आहे. शहरातील क्रीडा संकुलांसाठी 51 कोटीचा स्वतंत्र आराखडा तयार केला त्याला मान्यता घेतली पैकी पंधरा ते वीस कोटी मिळाली .सुपा एमआयडीसी बरोबर नगरची एमआयडीसीला मान्यता मिळाली असती परंतु विरोधकांनी त्यामध्ये खोडा घालण्याचे काम केले. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे विळत घाट येते 600 एकर जमीन नूतन एमआयडीसीसाठी आणली पुढच्या टप्प्यात एमआयडीसीची निर्मिती करणार .यामध्ये छोट्या छोट्या मजुरापासून सर्वांच्या हाताला काम मिळणार आहे . शहरासाठी 24 तास काम केले शहराची आस्था होती आपुलकी होती म्हणून शहराचा विकास झाला जेथे विकास असतो तेथेच लोक वस्ती वाढते ही आपल्या शहराची ओळख आहे . स्टेट गव्हर्मेंट कडून स्पोर्ट कॉम्प्लेक्स मंजूर करून आणले त्यासाठी 12 ते 13 कोटीचा निधी आणला.निवडणूक महत्त्वाची नाही शहराचा विकास अजेंडा हा महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले.
सिए सानित मुथा म्हणाले आ. जगताप यांनी आमदारकीच्या माध्यमातून शहराला नवी दिशा देण्याचे काम केले आहे .विकासाची नवी दिशा त्यांनी शहराला दिली . मायक्रोव्हिजन असलेले हे आमदार आहेत . शहराचा सर्वांगीण विकास त्यांनी केला .त्यांना तिसऱ्यांदा निवडून देण्यासाठी सीए शाखा त्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वांचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.




Total Users : 611525