spot_img
spot_img

कर्डिले उमेदवारी अर्ज दाखल जोरदार शक्ती प्रदर्शन 

करंजी( जनता आवाज वृत्तसेवा ):- माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आज राहुरी येथे विधानसभेसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

राहुरी – नगर -पाथर्डी या विधानसभेसाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार कर्डिले यांनी आपला बालेकिल्ला असलेल्या नगर व पाथर्डी तालुक्यातील व राहुरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. अक्षय कर्डिले यांची रॅली या कार्यकमाचे विशेष आकर्षण ठरली. हि निवडणूक आमदार तनपुरे यांना सोपी नसल्याचे दाखवत कर्डिले यांनी पुन्हा एकदा आपणच विजयी होणार असल्याचे यावेळी सांगितले.

हि निवडणुक कर्डीले यांनी चांगलीच मनावर घेतली असल्याचे दिसत येत आहे.उमेदवारी मिळाल्याबरोबर शिवाजी कर्डिले यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. राहुरीतून स्वतः शिवाजी कर्डिले यांनी दौरा करत गावोगाव फिरून प्रचार केला तर नगर तालुक्यातून शिवाजीराव कर्डिले यांच्या पत्नी अलकाताई कर्डिले यांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरुवात केली तर शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र युवा नेते अक्षय कर्डिले यांनी पाथर्डी तालुक्यातील त्या ३९ गावांमध्ये जाऊन चार दिवसात संपूर्ण गावे वाडी वस्ती घेत प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली. दुसऱ्या बाजुला नगर आणि पाथर्डी तालुक्यातील या गावांमध्ये तनपुरेचे कार्यकर्तेच सक्रिय झालेले दिसत नाहीत अशावेळी कर्डीले यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केल्याचे दिसून येत आहे.

पालवे यांचे भाजप प्रवेश 

 उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे यांनी आपल्या सहकार्यांबरोबर भाजपमध्ये प्रवेश केला. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजी पालवे यांच्या रूपाने आमदार प्राजत तनपुरे यांना मोठी साथ मिळाली होती. मात्र यावेळी पालवे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुन्हा एकदा या भागातून कर्डिलेचचे पारडे आणखी जड झाल्याचे या घटनेवरून स्पष्ट दिसत आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!