श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- दीपावली पाडव्यानिमित्त श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, लोकनियुक्त नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी शहरात दोन दिवस व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेत शुभेच्छा दिल्या.
दीपावली पाडव्यापासून व्यापाऱ्यांचे नवीन वर्ष सुरू होते. त्यानिमित्त व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेत त्यांना शुभेच्छा देण्याची परंपरा आहे. त्यानुसार आमदार कानडे व आदिक यांनी दोन दिवस शहरात फिरून व्यापाऱ्यांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील मेनरोड, शिवाजी रोड, संगमनेर-नेवासा रोड व्यापाऱ्यांना भेटून त्यांना दीपावली व पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यापाऱ्यांनीही त्यांना प्रतिसाद देत आमदार कानडे व आदिक यांना शुभेच्छा दिल्या. या फेरीस शहरातील व्यापारी कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी अरुण पाटील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी, सुनील थोरात, तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, जिल्हा उपाध्यक्ष रईस जागीरदार, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, तालुका युवक उपाध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, महिला तालुकाध्यक्ष मंदा गवारे, युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका जनवेजा तसेच अशोक कारखान्याचे माजी संचालक प्रा कार्लस साठे, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, सतीश बोर्डे, वळदगावचे सरपंच अशोक भोसले, सचिन जगताप, मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे, राजेंद्र कोकणे, विष्णुपंत खंडागळे, युनुस पटेल, विजय शेलार, आदिवासी भिल्ल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, मल्लू शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव फारुख पटेल, ऍड. राजेश बोर्डे, बाळासाहेब उंडे, श्रीकांत दळे, अविनाश नागरे, सुधाकर बोंबले, राहुल बोंबले, भागचंद औताडे, अक्षय नाईक, बाबासाहेब कोळसे, सुरेश पवार, राजेंद्र औताडे, आबा पवार, मदन हाडके, रमेश आव्हाड, अमोल आदीक, ज्ञानदेव आदीक, दीपक कदम, अजिंक्य उंडे, शब्बीर पटेल, बंडू कोकणे, जयकर मगर, दीपक निंबाळकर, महेश खंडागळे, नानासाहेब रेवाळे, इमरान शेख, भैय्या शहा, सागर कुऱ्हाडे, अण्णासाहेब गवारे, सुदाम पटारे, प्रताप पटारे रवींद्र मुरकुटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, पी. एस. निकम, रवी अण्णा गायकवाड, सचिन ब्राह्मणे, संदीप दांगट, राधाकृष्ण तांबे, विजय दवंगे, जमीर पिंजारी, किशोर कांबळे, हरिश्चंद्र साळुंके, रवी राजुळे, आशिष शिंदे, कल्पेश माने, सम्राट माळवदे, प्रतीक कांबळे, निखिल कांबळे, रुबीना पठाण, रमा धीवर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, मतदार संघातील कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



