अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- नगर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे. मागील दहा वर्षांमध्ये केलेली विकास कामे व जनतेच्या सुखदुःखात सामील होत थेट संपर्क ठेवला असल्यामुळे ऋणानुबंध निर्माण झाले असून आता माझी निवडणूक थेट जनतेनेच हाती घेतले आहे. तोफखाना बागडपट्टी सर्जेपुरा परिसरामध्ये नागरिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो असता मोठ्या उत्साहात स्वागत केले.
यावेळी नागरिकांच्या वतीने ठिक-ठिकाणी फुलांचा वर्षाव आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात येत होती, जनतेचे प्रेम पाहून माझा विजय निश्चित झाला आहे त्यामुळे तिसऱ्यांदा नगरकरांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून केलेली विकास कामे नागरिकांच्या घरापर्यंत घेऊन जाण्यास यशस्वी झालो आहे. नागरिकांनी दिलेल्या मतरूपी आशीर्वादाच्या माध्यमातून नगरकरांची सेवा करण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा मिळत आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार संग्राम जगताप यांनी तोफखाना, बागडपट्टी, सर्जेपुरा, मिसाळ गल्ली, सातभाई गल्ली, पावन गणपती मंदिर, ठाकूर गल्ली, परदेशी गल्ली, नवरंग गल्ली, शेरकर गल्ली, लोणार गल्ली परिसरातील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे, माजी उपमहापौर दीपक सूळ, मालन ढोणे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, कालिंदी केसकर, गुलाबराव पवार, सारंग पंधाडे, सुरज जाधव, पोपट पाथरे, अजय साळवे, राजेंद्र बोगा, अभिजित चिप्पा, श्वेता पंधाडे आदीसह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तित होते.
आ. संग्राम जगताप यांनी दिल्ली गेट येथील शनि गणपती मंदिर येथे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली. यावेळी तोफखाना बागडपट्टी येथील महिलांनी ठीक ठिकाणी औक्षण करीत पेढे खाऊ घालत, स्वागत करत लाडक्या बहिणी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत, अशी साद यावेळी घातली.




Total Users : 611329